Ashish Shelar : जयंत पाटलांच्या पराभवामागे कोणाचा हात? वरिष्ठ नेत्याने सांगितली आतली माहिती…
Ashish Shelar : काल विधान परिषदेचा निकाल लागला. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीनं बाजी मारली. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीनं पाठिंबा दिलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला.
या निकालानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विधान परिषदेच्या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
‘महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गटाची ही कार्यपद्धती राहिली आहे, की महाराष्ट्रात अन्य कोणत्याही पक्षाला स्थान मिळू नये. ते अन्य पक्षावर दोषारोपण करतात. सलग तीन उदाररणं दिसत आहेत. राजू शेट्टींना त्यांनी लोकसभेत मदत केली नाही. मुंबई शिक्षक मतदारसंघात त्यांनी त्यांचा उमेदवार दिला. Ashish Shelar
कपील पाटील यांना संपविण्याचा प्रयत्न केला. शेतकरी नेते जयंत पाटील यांना पाडण्यामागेही उद्धव ठाकरे आणि पक्षाचाच हात आहे. आम्ही ही वर्तणूक पहिली आहे, आणि आता पुढचा नंबर शरद पवार यांचा असेल असं भाकीत मी करतो,’ असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की ‘फेक नेरेटीव्ह चालवणं हे महविकास आघाडीचं काम आहे. १५ मत महायुतीला अधिक पडली. ८ मतं फुटली ती गुलदस्त्यात आहेत. यामध्ये काँग्रेस, ठाकरे गट आणि अन्य मत फुटली आहेत’ असं शेलार यांनी म्हटलं आहे.