रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे कडाडले, म्हणाले, आता कळेल…!! थेट भाजपवर निशाणा


पुणे : रवींद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनी आज काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतले आहे.

त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत मंत्री उदय सामंत, उपसभापती नीलम गोऱ्हे, प्रकाश सुर्वे हे उपस्थितीत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आता लोकांना धंगेकर कोण आहे ते कळेल, असे ओपन चॅलेंज केले.

रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी रवींद्र धंगेकर यांचे शिवसेनेत स्वागत केले. रवींद्र धंगेकर यांचा प्रवास नगरसेवकापासून आमदारापर्यंत झाला. ते एक आदर्श कार्यकर्ता आहेत. ते १० वर्ष शिवसेनेचे नगरसेवक होते. आता ते पुन्हा स्वगृही आले, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहे.

आता तुम्ही शिवसेनेत आला आहात. आता लोकांना कळेल who is dhangekar? पोटनिवडणूक गाजली. मात्र एवढं करून पण धंगेकरांनी बाजी मारली आणि तिथे त्यांनी दाखवून दिलं लोकसेवक म्हणजे काय असतं. काँग्रेस हा वेगळ्या टाईपचा पक्ष आणि हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे. इथे कामाने लोकनेता ओळखला जातो. तुम्हाला माहित आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. आज पुणेकर मी त्यांना काँग्रेसचे म्हणणार नाही, कारण ते मूळ शिवसेनेचे आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

रवींद्र धंगेकर यांची पुण्यात लोकप्रिय नेता म्हणून ओळख आहे. मी तिकडे पुण्यात निवडणुकीला गेलो होतो. मात्र सगळी फौज लागली तरी रवींद्र धंगेकर यांनी ती पोटनिवडणूक गाजली. रवींद्रने बाजी मारली. मला लोकांनी हलक्यात घेतलं. मात्र २०२२ ला ३३ देशांना कळले की who is eknath shinde? असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!