हडपसर ते यवत उन्नत सहापदरी मार्गाला मंजुरी ! सहापदरी मार्ग, उड्डाणपूल व मेट्रो अशा पध्दतीने बांधला जाणार हा मार्ग…..


जयदिप जाधव                                             उरुळीकांचन : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडीचा एक टप्पा म्हणून  वाहतुक कोंडीतून मुक्तता मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अश्वासनानंतर हडपसर ते यवत या उन्नत मार्गाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.या कामासाठी राज्य सरकारने ५२६२.२६ कोटी रूपये इतका निधी मंजूर केला आहे.

 

महाराष्ट्र राज्य रस्ते मंडळाने या उन्नत योजनेअंतर्गत या रस्त्याचा डिपीआर सादर केला असून बांधा ,वापरा व हस्तांतरीत (बियोटी) तत्तावर हा महामार्ग विकसित करण्यात येणार आहे. पुण्याच्या बाह्यवळण मार्गांना एन्ट्री व एक्सिट न करता तीनमजली मार्गांचा डीपीआर तयार झाल्याने निविदा व टेंडर प्रक्रियेनंतर या जागतिक दर्जाच्या इलिव्हेटेड मार्गाला सुरुवात होणार आहे.

पुणे शहराला जोडणाऱ्या पुणे -सोलापूर व पुणे -अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उन्नत पध्दतीने या महत्वकांक्षी प्रकल्पांना यंदाच्या वर्षीच श्रीगणेशा होणार असल्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यानुसार पुणे – अहिल्यानगर मार्गांसाठी काही बदल करुन हा मार्ग विमाननगर ते शिरुर असा तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. तर दुसरीकडे पुणे -सोलापूर महामार्गासाठीही उन्नत मार्गात सहापदरीकरण मार्ग हडपसर ते यवत पर्यंत सहापदरीमार्ग करण्याचे निर्णय झाला आहे. परंतु मेट्रो मार्गिका ही थेट यवत पर्यंत असावी यासाठी आ.  राहुल कुल पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे दोन्ही मार्गात किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.

 

त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत या मार्गाच्या खर्चाला मंजुरी मिळून कामाला मान्यता मिळाली आहे.त्यानुसार या उन्नत मार्गाला अतिरिक्त भूसंपादन न करता कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हडपसर ते यवत हा महामार्ग बांधा , वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर पथकर गोळा करुन विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सहापदरीमार्ग ,त्यावर उड्डाणपूल तसेच मेट्रो रचना असा तीन पदरी इलिव्हेटेड उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे.

 

त्यासाठी ३० मीटर (९८.४० फूट ) ताब्यात असलेल्या महामार्ग हद्दीत या सहापदरी उड्डाणपूलाची उभारणी होणार आहे. त्यासाठी अप्रायझर व डाऊनरायझर या दोन्ही ठिकाणी पुलावर प्रवेश व उतरण्यास अधिक भूसंपादन आवश्यकता असल्यास भूसंपादन करण्यात येणार आहे.

 

हडपसरच्या सासवड रोड उड्डाणपूलापासून १०० मीटर अंतरावर उड्डानपूलाची सुरुवात होणार आहे. त्यापुढे ३१.५०० किलोमीटर अंतरापर्यंत यवत हद्दीपर्यंत सहापदरी उड्डानपुलाची रचना तयार करण्यात आली आहे. हा इलिव्हेटेड मार्ग फुरसुंगी व कदमवाकवस्ती हद्दीतून जाणाऱ्या पीएमआरडीए ६५ मीटर अंतरावर ओव्हरब्रिज तयार होऊन पास होणार आहे. तर दुसरा रींग रोड असलेल्या कोरेगावमूळ व सोरतापवाडी हद्दीत १२० मी. हद्दीत रिंग रोडपासून १० मीटर उंचीवरून हा मार्ग पुढे जाणार आहे. त्यामुळे चालू वर्षातच या उन्नती मार्गाचा निविदा व टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

‘”बीओटी तत्वावर उन्नती योजनेतून हा सहापदरी मार्ग विकसित होणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाने खर्चाला मंजुरी दिली आहे. सहापदरी रस्ता, सहापदरी फ्लायओव्हर व मेट्रो मार्ग रचना आहे. एमएसआरडीसी ने डीपीआर तयार केला असून पुढील शासन स्तरावर प्रक्रिया होईल'”

-संतोष भंपलवार , कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!