फडणवीसांनी थोपठली पाठ! कोयता हल्ल्यात तरूणीला वाचविणाऱ्या युवकांचे फोन करून कौतुक…

पुणे : एका तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात एमपीएससी क्लासेस असलेल्या भागात ही घटना घटली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेतील हल्ल्यात तरुणीला वाचविणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईलवर कौतुक करून शुभेच्छा दिल्या. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी संपर्क करून दिला.
एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकाजवळ एका वीस वर्षीय तरुणीवर शंतनू जाधव याने कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यातून तरुणीला लेशपाल जवळचे आणि हर्षद पाटील या दोघांनी वाचविले होते.
गेल्या मंगळवारी ही घटना घडली होती. तरुणीला वाचविणा-या या दोघा युवकांचे विविध संस्था संघटना कडून कौतुक होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांशी दूरध्वनी द्वारे गुरुवारी संपर्क साधून त्यांचे कौतुक केले.