ग्राहकांना आणखी मोठा धक्का! गॅस सिलेंडरच्या नियमात मोठा बदल; जूनपासून तुमचं कनेक्शन बंद होणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती


पुणे : एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅससारख्या सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या नियमांनुसार ‘नो ड्युअल गॅस कनेक्शन’ धोरण अधिक कडक करण्यात येणार असून, एका पत्त्यावर दोन गॅस कनेक्शन आढळल्यास कारवाईची शक्यता आहे.

शहरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) सेवा वाढत असल्याने अनेक घरांनी एलपीजीसोबत PNG कनेक्शनही घेतले आहे. मात्र काही ग्राहकांनी जुने एलपीजी कनेक्शन अद्याप सरेंडर केलेले नाही, त्यामुळे कंपन्यांनी अशा ग्राहकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे.

नवीन नियमानुसार, ज्या ग्राहकांकडे एकाच पत्त्यावर एलपीजी आणि PNG दोन्ही कनेक्शन आहेत आणि त्यांनी एलपीजी कनेक्शन सरेंडर केलेले नाही, त्यांचे कनेक्शन येत्या काही महिन्यांत बंद होऊ शकते, असा इशारा दिला जात आहे.

अशा ग्राहकांना दंड टाळण्यासाठी संबंधित गॅस एजन्सीकडे (इंडेन, भारत गॅस किंवा एचपी गॅस) जाऊन कनेक्शन सरेंडर करणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्ज भरून सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावे लागतात. त्यानंतर सुरक्षा ठेव रक्कम (सेक्युरिटी डिपॉझिट) बँक खात्यात परत मिळते.

सरेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहक कोणत्याही अडथळ्याशिवाय PNG सेवेचा वापर करू शकतात. दरम्यान, एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मार्च 2026 मध्ये 60 रुपयांची वाढ झाली असून, सध्या किंमत 1000 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!