नागपूर हिंसाचार प्रकरणी अजून एका आरोपीला अटक, ‘असा’ अडकला जाळ्यात…

नागपूर : येथील हिंसाचार प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता या प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात फैजान खातीब याला हिंसाचाराच्या सुमारे दहा दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. फैजान खातीब हा जहाल विचारांचा असून त्याने जमावाला भडकावले असल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणाच्या तपासात रोज नवी माहिती पुढे येत असताना नागपूर पोलिसांनी या प्रकरणात तिसरी मोठी अटक केली आहे. फैजान खातीब सह आणखी एक आरोपी शहबाझ काझी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. याआधी नागपूर दंगलीचा कथित मास्टर माईंड फईम खान यांच्या घरावर मनपाकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली.
मनपाने फहीम खानच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या दरम्यान या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागपुरातील दंगलीचा सूत्रधार फहीम खान शमीम खान याच्या घरावर मनपाने बुलडोझर कारवाई केली आहे.
दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र अजूनही सुरूच आहे. फैजान खातीब हा अकोल्यामध्ये असतो. मात्र ईद निमित्त महिनाभरापूर्वी तो त्याच्या मूळगावी नागपुरात आला होता. १७ मार्चला नागपूरला झालेल्या हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हीडीओ फुटेजच्या माध्यमातून खातीबला पोलिसांनी अटक केली आहे.
फहीम खानचे घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. नागपूर महापालिकेने फहीम खानच्या कुटुंबीयांना याची नोटीस बजावली. ‘दंगेखोरांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.