पुणे शहरात सिंहगड कॉलेजसमोर पोलिसांनी ट्रक अडवला, एसी ट्रक उघडताच पोलिसांना बसला धक्का! गाडीत 57 टन…


पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कुसगावच्या हद्दीतील सिंहगड कॉलेजसमोर काही गोरक्षकांनी दोन मोठ्या वातानुकूलित कंटेनरमध्ये गोमांस असल्याचा संशय व्यक्त करून याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक नवजवान जाधव, सागर अरगडे व पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

यानंतर दोन्ही कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीसाठी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याजवळ घेऊन आले. ही माहिती सर्वत्र पसरल्याने मोठ्या संख्येने गोरक्षक लोणावळ्य ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. या प्रकरणी सिकंदराबाद, हैदराबाद येथील मे. एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीच्या मालकासह दोन्ही कंटेनरच्या चालकांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बेकायदा गोमांस विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी तसेच बनावट कागदपत्रांद्वारे गोमांस नसल्याचे दर्शवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद सुमारे ५७ टन गोमांस न्हावाशेवा पोर्ट, नवी मुंबई येथे विक्रीसाठी नेले जात होते. दरम्यान, पोलिसांनी नमुने घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी अनिल परंडवाल यांना प्राचारण करण्यात आले व त्यांनी दोन्ही कंटेनरमधील काही बॉक्स तपासणीसाठी पाठवले होते.

या प्रकरणी में. एशियन फूडस मीम कंपनीचा मालक महंमद सादिक कुरेशी व कंटेनरचालक नदीम कलीम अहमद व नसीर महंमद अहमद यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.

गोरक्षकांच्या सजगतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पोलिसांनी जोपर्यंत नमुन्यांचा चौकशी अहवाल येत नाही, तोपर्यंत गुन्हा दाखल करणे उचित नसल्याचे गोरक्षक व विविध संघटना, संस्थांच्या प्रतिनिधींना सांगितले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!