‘मेहेंदीच्या पानावर मन अजून झुलतयं रे’ गाण्यांचे बोल बासरीत टिपताचं…रसिकांचा ठेका! उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात वर्धापनदिन ठरला बासरींचा स्वर…!

उरुळी कांचन : ‘मेहेंदीच्या पानावर मन अजून झुलतयं रे ‘ अशा मराठी व हिंदी गाण्यांचा स्वरांना बासरीत स्वर बाधित करीत रसिक प्रेक्षकांना बासरीच्या तालावरुन नाचवून स्वरांचे शृंगार काढणाऱ्या प्रसिद्ध बासरी वादक ब्रिक्रमजीत सिंग यांच्या मोहक बासरीवादनाने रसिकांची मने जिंकून प्रसिद्ध महात्मा गांधी निसर्गोपचार आश्रमाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील जागतिक कीर्ती च्या महात्मा गांधी निसर्गोपचार आश्रमाचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात प्रसिद्ध बासरीवादक ब्रिकमजीत सिंग यांनी बासरीच्या स्वरांनी उपस्थितांना
मंत्रमुग्ध केल्याने बासरीवादन हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
उरुळी कांचन येथील महात्मा गांधी निसर्गोपचार आश्रमाचा ७७ वा वर्धापन दिन गुरुवारी २३ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी पोषण शिबिरे आणि गरजू आणि गरीबांना अनुदानित आणि मोफत उपचार असे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात बासरीवादक बिक्रमजीत सिंग यांनी मराठी व हिंदी गाण्यांवर बासरीवादन केले.या बासरी स्वरांनी नागरीकांना गाण्यांवर ठेका घेण्याचा मोह न आवारल्याने रसिकांनी कार्यक्रमाला विशेष पसंती दिली.कार्यक्रमासाठी बासरीवादक बिक्रमजीत सिंग, तालवादक प्रेम मूर्ती, गिटारवादक विनेश रामचंद्रन, अबोशकर पटेल, नादब्रह्म बँडमधील वासू तनेजा, अरुणिमा नंदा, रुचिला यांचा सहभाग होता.
वर्धापन दिन कार्यक्रमासाठी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. नारायण हेगडे, विश्वस्त माऊली कांचन, गिरीश सोहनी, आश्रमाचे व्यवस्थापक प्रवीण कुंभार, सीएमओ डॉ. अमेय देवीकर डॉ .कुशाण शहा, सहाय्यक प्रशासक सतीश सोनवणे (ममदापूर), यांच्यासह आश्रमाचे कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते.
दरम्यान, आश्रमाच्या ७७ व्या वर्धापनदिनी आश्रमाच्या वाटचालीचा प्रवास कार्यक्रमात मांडण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे स्वतंत्र्यापूर्वी या आश्रमात आठ दिवस मुक्कामी होते. त्यांनी मानवी शरीरावर नैसर्गिक पद्धतीने उपचार पध्दती व्हावी म्हणून त्यांचे शिष्य पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई ,पूज्य बाळकोबा भावे व इतरांनी मिळून २३ मार्च १९४६ साली आश्रमाची स्थापना केली होती.
या आश्रमात गेली ७७ वर्षात बहुतांश रोगांवर, आजारांवर प्रभावीपणे नैसर्गिक उपचार करण्याची पद्धती आहे. देशातच नव्हे तर जगात नैसर्गिक पद्धतीने सेवा करणारी संस्था म्हणून परिचित आहे. जगभरात नागरीक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. दर वर्षी १० हजारांहून अधिक रुग्णांवर याठिकाणी उपचार केले जातात. एका वेळेस २०० रुग्णांवर उपचार होऊ शकतील, एवढी या उपचार केंद्राची क्षमता आहे.
रुग्णांवर नैसर्गिक उपचारासह आहार, योगा व्यायामपद्धती, मसाज, स्टीम बाथ, जलोपचार, अॅक्युप्रेशर यांसारख्या उपचार पद्धती वापरून स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात, दमा, मायग्रेन आणि तणावग्रस्त आजारांवर आश्रमात प्रभावीपणे उपचार केले जातात.
याव्यतिरिक्त दैनंदिन जीवनात आहाराचे महत्त्व, तणावापासून मुक्तता मिळवण्याची माहिती या विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात. आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी योगा व निसर्गोपचाराचे प्रशिक्षण वर्गही घेतले जातात.
दरम्यान, यावेळी महिलांसाठी खास योगा, मसाज प्रशिक्षण अभ्यासक्रम, योग प्रशिक्षक अभ्यासक्रम, पारंपरिक आरोग्य अभ्यासकांचे प्रशिक्षण असे विविध बहुआयामी कार्यक्रम राबवले आहेत. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर चौधरी यांनी केले आहे.