Anil Deshmukh : देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट बघतोय, अनिल देशमुख यांचे मोठं वक्तव्य, नेमकं घडलं काय?

Anil Deshmukh : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख हे दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला सातत्याने अडकविण्याचा प्रयत्न करीत असून मी देखील आपल्या अटकेची वाट पाहत असल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
यामुळे पुन्हा एकदा फडणवीस-देशमुख असा आजी-माजी गृहमंत्री यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. अनिल देशमुख म्हणाले की, “उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ४ वर्षापुर्वीची घटना उकरुन काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने सीबीआयच्या माध्यमातून एफआयआर दाखल केला आहे. Anil Deshmukh
तसेच ४ वर्षापुर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे.
माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. मात्र, ज्या फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ईडी-सीबीआयला हाताशी धरुन महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले. देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असे म्हणत देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.