दौंड शहरात छेडछाडीचा संतापजनक प्रकार! दोन तरुणांनी गाडी अडवली अन्…,घटनेने खळबळ


दौंड : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. सध्या अशीच एक धक्कदायक घटना दौंड तालुक्यातून समोर आली आहे. शहरातील हिंद टॉकीज जवळ दोन तरुणींची छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता.१८) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दौंड हद्दीतील हिंद टॉकीज जवळ ही घटना घडली आहे.

किरण राजू पवार आणि चंद्रकांत उर्फ हड्डी धोत्रे (दोघेही रा. वडार गल्ली, दौंड) यांच्याविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात भा.दं.वि. 74, 351(2), 3(5), तसेच बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी (ता.१८ ) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि तिची मैत्रीण सिटी इन हॉटेलमधून जेवण करून स्कुटीवरून घरी निघाल्या होत्या. यावेळी हिंद टॉकीज जवळ आरोपी किरण पवार आणि चंद्रकांत धोत्रे हे मोटारसायकलवर आले आणि फिर्यादीच्या गाडीला आडवे येऊन जबरदस्तीने त्यांना अडवले.

आरोपी चंद्रकांत धोत्रे याने फिर्यादीची ओढणी खेचून तिचा उजवा हात पकडला आणि “तु माझ्यासोबत चल” असे म्हणत विनयभंग केला. पीडितेने त्याचा हात झटकुन बाजुला केला.

तसेच त्याच वेळी आरोपी किरण पवार याने पीडितेची मैत्रीण हिच्या डाव्या हाताच्या दंडाला धरुन तिला तु माझे सोबत येती का असे म्हणुन तिला गाडीवरुन खाली खेचुन तिचें मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तुम्ही आमचा हात का धरला, तुम्ही आमचा हात धरणारे कोण लागुन गेले असे म्हणाले असता त्या दोघांनी शिवीगाळ केली.

दरम्यान, घाबरलेल्या पीडितांनी तेथून निघून बसस्टँडजवळ थांबून आपला भाऊ आणि मित्राला घडलेली घटना सांगितली. त्याच वेळी आरोपी पुन्हा तेथे आले आणि पुन्हा अश्लील वर्तन व शिवीगाळ केली. पीडितेने घरी जाऊन वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला व नंतर दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!