शरद पवार – नितीशकुमार यांच्यात महत्वपूर्ण चर्चा , देशातील विरोधी पक्ष एकत्र येणार?, शरद पवार म्हणाले..

मुंबई : देशातील माहौल पाहिल्यानंतर लोकशाही वाचवण्यासाठी सोबत राहून काम करणे गरजेचे आहे. सोबत काम केल्यास देशाला विरोधी पक्षांचा चांगला पर्याय मिळेल. त्या पर्यायाला लोकं समर्थन देतील अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मांडली आहे.
नितीश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले कि, कर्नाटकातील जनता भाजपचा पराभव करेल. ही कर्नाटकातचं नव्हे तर देशात स्थिती आहे. त्यासाठी आम्हाला मिळून काम करावं लागेल. देशात दुसरा पर्याय निर्माण करण्यासाठी नितीशकुमार यांनी सुरुवात केली आहे. त्यासंदर्भात संवाद झाला आहे. दिल्लीत आम्ही बसलो होतो. नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी राहुल गांधी, मल्लीकार्जून खर्गे होते, असंही शरद पवार म्हणाले.
कर्नाटकातील जनता भाजपचा पराभव करेल. ही कर्नाटकातचं नव्हे तर देशात स्थिती आहे. त्यासाठी आम्हाला मिळून काम करावं लागेल. देशात दुसरा पर्याय निर्माण करण्यासाठी नितीशकुमार यांनी सुरुवात केली आहे. त्यासंदर्भात संवाद झाला आहे. दिल्लीत आम्ही बसलो होतो. नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी राहुल गांधी, मल्लीकार्जून खर्गे होते, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
देशाच्या हितासाठी एकत्र आलोत
नितीश कुमार म्हणाले, आम्ही भेटायला आलो होतो. देशात भाजप जे काही करते ते देशाच्या हिताचे नाही. देशाच्या हितासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष सहमत आहोत. अनेक पक्षांसोबत बोलणं सुरू आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ. देशाच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. सर्वांची संमती आहे.