कानगावमध्ये गाडी, बाईक नंतर अंगावरील कपडे जाळून मराठा समाजाचे लक्षवेधी आंदोलन..

कानगाव : राज्यात सध्या मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. आता आज कानगाव मधील मराठा समाज तरुणांनी अंगावरील कपडे जाळून मराठा आरक्षण मिळावे यासाठी लक्षवेधी आंदोलन केले.
जालना जिल्ह्यातील उपोषणकर्त्यांच्या वरती झालेला लाठीचार्ज व गोळीबार नंतर अनेक ठिकाणी रस्तारोको केला जात आहे. कानगावमध्ये काल गाव बंद ठेवून निषेध सभा घेऊन आंदोलकावरील लाठीचार्जचा निषेध करण्यात आला व आज पुन्हा कानगावमध्ये मराठा समाजाने अंगावरील कपडे जाळून राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.
मराठा समाजामध्ये आरक्षणासाठी जेवढी आंदोलन झाली या कोणत्याही आंदोलनामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे अथवा सरकारी मालमत्तेचं किंवा खाजगी मालमत्तेचं नुकसान झालं नाही. लाखोच्या संख्येने निघाले तेव्हा सुद्धा मराठा समाज आंदोलकांनी कोणालाही त्रास दिला नाही किंवा कोणाचेही नुकसान केली नाही.
तसेच सध्या चालू असलेल्या आंदोलनामध्ये सुद्धा मराठा समाज स्वतःच्या गाड्या व कपडे जाळत आहे. परंतु सार्वजनिक सरकारी अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान न करता आंदोलन करत आहे व शासनाचे लक्ष वेधत आहे.
कानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथे मराठा समाजाने आपल्या अंगावरील कपडे जाळून शासनाचे लक्ष वेधले आहे. यावेळी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब फडके, पिंटू चौधरी, नामदेव निगडे, बाळासाहेब नलवडे, महादेव चौधरी, पांडुरंग फडके, राहुल फडके, तात्यासो मोरे दादासो गवळी, रामदास पवार, गणपत नलवडे, डॉक्टर बापूराव फडके, हरिभाऊ खराडे, फडके, भानुदास फडके इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.