अशा मित्रापेक्षा दुश्मन बरा!! मित्राच्या पगारात ५० रुपये जास्त दिल्याने आला राग, थेट डोक्यात दगड घालून…


नाशिक : नाशिकमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला असून अगदी क्षुल्लक कारणामुळे सहकर्मचाऱ्याची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काल सकाळी एका परप्रांतीय व्यक्तीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याची घटना घडली होती.

या घटनेमुळं परिसरातएकच खळबळ उडाली होती. शांतीलाल ब्राह्मणे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकचा तपास केला असता, आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत एका मजुराने दुसऱ्या मजुराच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

पन्नास रुपयेसाठी हत्या..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे एकमेकांना ओळखीत होते. या दोघांमधील एकाला २०० रुपये तर दुसऱ्याला १५० रुपये दिवसाला पगार मिळत होता. याच कारणावरुन झालेल्या वादातून शांतीलाल ब्राम्हणे यांची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. संतोष अहिरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. या घटनेने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!