अमित शाह यांची राहुल गांधींवर टीका, म्हणाले, संसदेतील अनुपस्थिती, पण…

नवी दिल्ली : देशाच्या धोरणात्मक दृष्टीकोनावर आणि जागतिक स्तरावरच्या स्थानाबाबत सखोल मते गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मांडली आहे. टाइम्स नाऊ समिट २०२५ च्या समारोपात अमित शाह यांच्या बहुप्रतिक्षित सत्राने या समिटचा उत्कर्षबिंदू गाठला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे.
अमित शाह म्हणाले, मतदारसंघ पुनर्रचना ही घटनात्मक प्रक्रिया आहे आणि मी खात्री देतो की त्यामुळे कोणालाही ०.००१% देखील त्रास होणार नाही. जातीगणनेबाबत राहुल गांधी जे काही ऐकतात ते न विचारता स्वीकारतात, त्यांना वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज आहे.
संसदेत भाषणाच्या वेळेवर बंधन असते, पण जेव्हा राहुल गांधींना बोलायला संधी मिळाली, तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते. लोकांनी स्वतः विचार करावा—संधी गुणवत्ता आणि पात्रतेवर द्यायची का धर्माच्या आधारावर? असे ते म्हणाले आहे.
राहुल गांधींच्या नागरिकत्व प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले, “मी केवळ विरोधी पक्षात आहेत म्हणून त्यांच्यावर चिखलफेक करणार नाही. कायदेशीर प्रक्रिया होईल आणि गरज भासल्यास हा विषय न्यायालयात जाईल.
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत, शाह म्हणाले, “राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी परिस्थिती योग्य असावी लागते. मणिपूरमध्ये दोन समुदायांतील संघर्ष हा नवीन नाही. तो ४-५ वर्षांच्या चक्रात सतत घडत आला आहे. मात्र, आज परिस्थिती सुधारली आहे आणि ती अजून सुधारत राहील.
ते पुढे म्हणाले, भारताने तीन मोठ्या समस्यांचा सामना केला आहे, ज्यामुळे देशाची मोठी आर्थिक हानी झाली: डाव्या विचारसरणीचे उग्रवादी नक्षलप्रभावित क्षेत्रे, ईशान्य भारत आणि काश्मीर. ही देशाच्या प्रगतीला अडथळा आणणारी जखम होती. पण आता शांतता प्रस्थापित करणे हे गृहमंत्रालयाचे प्राधान्य आहे.”
काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच ४० वर्षांत कोणतेही पुनर्व मतदान, गोळीबार किंवा अश्रूधुराशिवाय निवडणूक पार पडली. हा खरा बदल आहे. दुसरीकडे, ममता बॅनर्जी घुसखोरांना केवळ मतबँक राजकारणासाठी प्रोत्साहन देत आहेत. हा विषय आम्हाला नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिगत हितसंबंधांशी संबंधित आहे.