मोठी बातमी! भारतातील सर्व टोलनाके होणार बंद, महत्वाची माहिती आली समोर..

नवी दिल्ली : भारतातील रस्ते वाहतुकीला अधिक सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. टोलनाक्यांवरील लांबच लांब रांगा आणि वाहनचालकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकार सॅटेलाइट आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे.
सुरळीत प्रवास आणि वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दिशेने केंद्र सरकारच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाही. टोल नाक्यावर आता सॅटेलाईट द्वारे टोल रक्कम वसूल केली जाणार आहे.
जीपीएस प्रणालीद्वारे हे सर्व केले जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले आहे. नितीन गडकरी म्हणाले की, पुढील १५ दिवसांत देशभरात एक नवीन उपग्रह-आधारित टोल वसुली धोरण सुरू केले जाईल.
दरम्यान, या प्रणाली अंतर्गत, वाहनांना आता टोल प्लाझावर थांबण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याऐवजी, प्रगत ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रह इमेजिंगच्या आधारे टोल शुल्क आपोआप कापले जाईल.
लांबच्या लांब लागणाऱ्या रांगा बंद करणे. इंधन वाचवणे आणि राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान येत्या एक एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
टोलनाक्यांवरील गर्दी आणि विलंब कमी करण्यासाठी सरकारने यापूर्वीच फास्टटॅग प्रणाली लागू केली आहे. मात्र, फास्टटॅग असूनही वाहनांना टोलनाक्यांवर थांबावे लागते. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सॅटेलाइट आधारित प्रणाली हा एक पर्याय आहे.