अलर्ट! संभाव्य भारत – पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर उद्या मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळण्याचा मिळणार सूचना ….

नवी दिल्ली : जम्मू कश्मीरच्या पेहलगाम हल्यानंतर संपूर्ण भारत पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली आहे. बैसरन घाटीत झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराचा बदला घेण्यात यावा अशी देशवासियांची भावना आहे. त्यामुळे पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला खुली छूट दिल्याने भारत – पाक युद्ध कधीही छेडण्याची शक्यता निर्माण झाल्याने या पार्श्वभुमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने ७ मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.
या मॉक ड्रील पासून नागरी संरक्षणाची सिद्धता तपासण्यासाठी केंद्र सरकारने युध्दाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे बुधवारी काय घडणार म्हणून सर्वांच्या नजरा या मॉक ड्रील रंगीत तालमीकडे लागून राहिल्या आहेत. मॉक ड्रील मध्ये सर्व राज्यांमध्ये सायरन वाजतील. वॉर्निंग सायरन वाजल्यानंतर शत्रूच्या हल्ल्यावेळी स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे याचे प्रशिक्षण या मॉक ड्रिलद्वारे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येईल. यामुळे देश युद्धाची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये शत्रूच्या हल्ल्याच्या बाबतीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर नागरिक, विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच क्रॅश ब्लॅक आउट उपायांची तरतूद, महत्त्वाच्या यंत्रे आणि संस्था लपविण्याची तरतूद बाहेर पडण्याच्या योजनेचे अद्ययावतीकरण आणि सराव याचा समावेश करण्यात आला आहे.
ड्रिलच्या दरम्यान ब्लॅक आऊटची तयारी करण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण संस्था आणि कारखाने यांना लवकरात लवकर लपवण्याची व्यवस्थादेखील करण्यात येईल. आपत्कालीन परिस्थितीत सुटकेच्या योजनांची माहिती अद्ययावत करण्याच्या आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.