पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गणेशोत्सवात दारूबंदी जाहीर, नियम लागू, जाणून घ्या…


पुणे : श्रवण महिन्यात धार्मिक वातावरणामुळे मद्यविक्री बंद राहते. मात्र, श्रावण संपल्यानंतर तळीरामांना हायसं वाटलं होतं. पण यंदाच्या गणेशोत्सवात त्यांना मोठा धक्का बसणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने दारूविक्रीवर कडक निर्बंध लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत शहरातील काही पोलिस ठाणे हद्दीत दारूची विक्री पूर्णतः बंद राहील. सार्वजनिक सुव्यवस्था, मिरवणूक व्यवस्थापन आणि श्रद्धाळूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून प्रशासनाकडून व्यापारी, नागरिक आणि मंडळांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आदेशांनुसार खडक, विश्रामबाग आणि फारसखाना पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारच्या दारू विक्री केंद्रांना तात्पुरती बंदी राहील. तसेच गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी आणि मुख्य विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात दारूबंदी लागू असेल. यामुळे ग्रामीण भागांसह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतही दुकाने बंद राहणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात गणेशोत्सवातील दोन महत्त्वाच्या विसर्जन दिवशी विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. ५व्या दिवशी व ७व्या दिवशी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच्या निर्धारित मार्गांवरील परिघात असलेल्या दारूविक्रीची सर्व आस्थापने बंद ठेवावी लागतील. मिरवणूक मार्गावर गर्दी व संवेदनशीलता लक्षात घेऊन अनुशासन राखणे आणि संभाव्य वाद टाळणे हा प्रशासनाचा उद्देश आहे.

दरम्यान, या बंदीचा परिणाम देशी-विदेशी दारू दुकाने, बार, वाइनशॉप्स आणि संबंधित परवानाधारक आस्थापनांवर होणार असून आदेशाच्या कालावधीत मालवाहतूक, बिलिंग किंवा थेट-थेट विक्री या कोणत्याही प्रकारची व्यवहार्यता ठेवता येणार नाही. उल्लंघन झाल्यास संबंधित परवान्यांवर कारवाई तसेच कायदेशीर पावले उचलली जातील, असा इशारा देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!