Alandi : माऊलींच्या समाधी सोहळ्याला आजपासून सुरुवात, हैबतबाबा पायरी पूजनाने कार्यक्रमास होणार आरंभ…

Alandi : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला मंगळवार (दि. 5) पासून माउलींच्या पालखी सोहळ्याचे जनक गुरुवर्य हैबतबाबा आरफळकर यांच्या पायरीपूजनाने सुरुवात होणार आहे. यासाठी लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त 5 ते 12 डिसेंबर या काळात आळंदीत कार्तिकी वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातील वारकरी भाविक आळंदीनगरीत दाखल होऊ लागले आहेत. हा एक मोठा सोहळा असतो. Alandi
दरम्यान, कार्तिकी वारी सोहळ्याची जय्यत तयारी आळंदी देवस्थान व आळंदी पालिका यांच्या वतीने सुरू आहे. भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला गेला आहे. भाविकांसाठी भव्य दर्शन बारी उभारण्यात येत आहे.
तसेच येणाऱ्याभाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी, मोबाईल टॉयलेट आदी सोयीसुविधा देखील देवस्थानतर्फे उपलब्ध करण्यात येणार आहेत. सध्या शौचालय दुरुस्ती, मोबाईल टॉयलेट उभारणी सुरू आहे. याबाबत कर्मचारी वर्ग काम करत आहेत.
तसेच शहरात पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. यासाठी जलवाहिनी दुरुस्ती केली जात आहे. सोहळ्यात कार्तिकी वद्य एकादशीला मध्यरात्रीपासून माउलींच्या संजीवन समाधीवर अकरा ब—ह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात पवमानपूजा, दुग्धाभिषेक होईल.
त्यानंतर माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याच्या बाहेर पडेल. नगरप्रदक्षिणेनंतर पालखी सायंकाळी मंदिरात पुन्हा प्रवेश करेल. भाविकांचे दर्शन दिवसभर सुरू राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.