शेतकऱ्याच्या पोराने फेरारीच्या अपमानाचा बदला म्हणून लॅम्बॉर्गिनी घेतली, खरी माहिती वाचून वाटेल आश्चर्य, जाणून घ्या…

नवी दिल्ली : लॅम्बॉर्गिनीची ओळख म्हणजे फक्त आणि फक्त वेग. जगातली पहिली खरी सुपरकार लॅम्बॉर्गिनीने बनवली होती. नाव म्यूरा. अनेक वर्षे जगातली सर्वात वेगवान कार ही बिरुदावली म्यूरा लॅम्बॉर्गिनीने अभिमानाने मिरवली.
लॅम्बॉर्गिनीचा निर्माता फेरुशिओ लॅम्बॉर्गिनीचा जन्म एका इटालीयन शेतकऱ्याच्या घरी झाला होता. पोराला शेतीपेक्षा शेतात वापरल्या जाणाऱ्या मशिनरी मध्ये जास्त इंटरेस्ट होता. विशेष करून ट्रॅक्टर सारखे शेतात लागणाऱ्या गाड्यासोबत तो तासनतास घालवायचा. फेरुशिओ आवड बघून त्याला पुढच्या शिक्षणाला कॉलेजला पाठवण्यात आले.
तेव्हा सुरु झालेल्या दुसऱ्या महायुद्धात त्याची निवड यन एअर फोर्समध्ये मेकॅनिक म्हणून झाली. शेतात लागणाऱ्या गाड्यासोबत तो तासनतास घालवायचा. फेरुशिओ आवड बघून त्याला पुढच्या शिक्षणाला कॉलेजला पाठवण्यात आले. तेव्हा सुरु झालेल्या दुसऱ्या महायुद्धात त्याची निवड इटालियन एअर फोर्समध्ये मेकॅनिक म्हणून झाली. युद्धाच्यावेळी ब्रिटीश सैन्याच्या हाती तो सापडला. वर्षभर इंग्लंड मध्ये तो युद्ध कैदी म्हणून होता. तिथून सुटका झाल्यावर मात्र त्याच आयुष्य बदललं.
आपल्या गावी फेरुशिओने एक गॅरेज उघडले. या गॅरेज मध्ये त्याने आपली जुनी फियाट कार मॉडीफाय करून तिला रेसकार बनवले. त्या अपघातानंतर मात्र त्याने आपलं लक्ष व्यवसायावर दिल. इटलीमध्ये महायुद्धानंतर उद्योगक्रांती आणि कृषीक्रांती झाली होती. फेरुशिओने मार्केट बरोबर ओळखले. त्याने लॅम्बॉर्गिनी कंपनी स्थापन करून ट्रॅक्टरची निर्मिती सुरु केली. त्याच्या ट्रॅक्टरने अल्पावधीतच खूप प्रसिद्धी मिळवली. बघता बघता फेरुशिओ कोट्याधीश बनला.
त्याने एकापेक्षा एक महागड्या गाड्या घेऊन आपल्या दारात उभ्या केल्या. वेगाने गाडी चालवायची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याकाळातल्या सगळ्या वेगवान गाड्या त्याच्या घेऊन झाल्या होत्या. एक दिवस त्याने फेरारी जीटी २५० ही कार विकत घेतली. नेहमीच्या सवयीने त्या कारच्या राइडला तो गेला.
दरम्यान, फेरारी चालवताना त्याच्या लक्षात आले की गाडीच्या कल्चमध्ये काही तरी गडबड आहे. गाडी दुरुस्त करून घ्यायला गेल्यावर फेरारीकडून चांगली सर्व्हिस न मिळाल्याने तो अधिक निराश झाला. ही गोष्ट त्याने फेरारीचे मालक एन्जो फेरारी यांच्या कानावर घातली. एन्जो फेरारी हे स्वभावाने खूप मग्रूर होते. त्यांना एक फालतू ट्रॅक्टरवाला आपल्याला शहाणपणा शिकवतोय ही गोष्टच सहन झाली नाही. फेरुशिओचा तोंडावर त्यांनी अपमान केला.
स्वतःला स्पोर्ट्सकारची आवड असल्यामुळे त्याला नक्की कशी गाडी बनवायची हे माहित होत. फेरारी सोडून आलेले दोन इंजिनियरना त्याने हाताशी धरले. आपल्या ट्रॅक्टरचे काही दमदार स्पेअरपार्ट वापरून त्याने काही महिन्यातच एक सुपरफास्ट कार लॅम्बॉर्गिनी ३५०GT बनवली. यानंतर त्याने बनवलेली म्यूराने तर सगळे रेकॉर्ड मोडले आणि ती पहिली सुपरकार बनली.