भाजपच्या ‘या’ आमदाराची पक्षातूनच हकालपट्टी, सहा वर्षांसाठी काढून टाकलं, नेमकं कारण काय?

कर्नाटक : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात आता कर्नाटकातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या एका आमदारावर कठोर कारवाई केली आहे.
पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना पक्षातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात भाजपकडून झालेली ही अशा प्रकारची पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) आमदार बसनगौडा पाटील यटनाल यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. राज्यस्तरीय पक्ष नेतृत्वावर टीका आणि पक्षाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय शिस्तपालन समितीने २६ मार्च रोजी एक पत्रक जारी करून, यटनाल यांच्या पक्ष शिस्तीच्या वारंवार उल्लंघनांना गांभीर्याने घेत ही कारवाई केली. समितीला असे आढळून आले की, यटनाल यांनी वारंवार पक्ष शिस्तीचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, या हकालपट्टीमागे त्यांची राज्यस्तरीय पक्ष नेतृत्वावरील जाहीर टीका आणि पक्षाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे ही प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षशिस्तीचा भंग आणि पक्षविरोधी वक्तव्ये यामुळे त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या वर्तनाची गंभीर दखल घेत हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.