‘अजितदादा साधे पोल्ट्री फार्मवाले, मी बोललो तर अंगावर कपडे राहणार नाहीत’

मुंबई : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अजितदादा पोल्ट्री फार्म वाले आहेत. ते सर्व ओबीसींचा निधी अडवून बसलेत, तर अमोल मिटकरी हा फडतूस आहे. मी जर बोललो तर मिटकरी आणि त्यांचा आका अजित पवार यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत, अशी जोरदार टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. हाके म्हणाले, 20 वर्षापासून अर्थ खात्याला चिटकून बसलेल्या अजित दादांनी अर्थ खात्यात पीएचडी केलीय का? ते तर साधे कोंबडीच्या पोल्ट्री फार्म वाले आहेत. त्यांनी भटके विमुक्त आणि मागास महामंडळाला 50 पैसे सुद्धा त्यांनी दिले नाहीत.
हाके यांना दिलेल्या फॉर्च्यूनर गाडीवरुन अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खालच्या पातळीवर टीका केली होती. त्या टीकेला हाके यांनी आज उत्तर दिले आहे. मी जर तुझ्या भाषेत उत्तर द्यायची वेळ आली तर तू आणि तुझा आका अजित पवार यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत, असेही ते म्हणाले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हाके म्हणाले, गाडी हे माझे साधन आहे. साध्य नाही. कोणाला टीका करायची ती करु द्या. अमोल मिटकरीला बाजारु विचारवंत असे म्हटले जाते. मिटकरी अजितदादांच्या घरी झाडू मारतात, त्याबदल्यात त्यांना आमदारकी दिल्याचे हाके म्हणाले. आम्ही जर मिटकरीला त्याच भाषेत उत्तर दिले तर त्याचीही आणि अजितदादांची देखील कपडे राहणार नाहीत, असेही हाके म्हणाले.
तसेच मिटकरी तू विधानपरिषदेचा सदस्य आहे. अजित पवार हे पोल्ट्री चालवणारा माणूस, काकांच्या जीवावर ते पुढे आले आहेत असे हाके म्हणाले. मुळात सगळे सरकारमध्येच आहेत. महाराष्ट्राला विरोधकच उरला नाही. असेही ते म्हणाले. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.