अजित पवारांचे विश्वासू किरण गुजर यांची छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीतून माघार, नेमकं घडलं काय? चर्चांना उधाण…

भवानीनगर : येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी विक्रमी तब्ब्ल ६०० अर्ज आले आहेत. यामध्ये आता अर्जाची छाननी झाली असून आता माघार कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू किरण गुजर यांनी छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
यामुळे याची चर्चा सुरु आहे. याचे कारण म्हणजे गुजर हे अजित पवारांच्या जवळचे मानले जातात. निवडणुकीसाठी किरण गुजर यांनी बारामती गटातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी माघार घेतला आहे. अजित पवार यांचे निकटवर्ती समजले जाणारे किरण गुजर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून निवडणुकीसाठी एकूण सहाशे अर्ज दाखल झाले होते. किरण गुजर यांनी बारामती गटातून पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात होती. आता मात्र त्यांनीच माघार घेतली आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी अर्ज माघारी घेतला आहे. किरण गुजर यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, कारखाना निवडणुकीत सध्या रंगत वादळी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी चेअरमन पृथ्वीराज जाचक एकत्र आल्याने यावेळी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
सध्या अनेकजण इच्छुक हे पवार आणि जाचक यांची भेट घेत आहेत. अनेकांनी आपल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावली असून २१ जणांमध्ये आपला नंबर लावण्यासाठी सध्या अनेकांची पळापळ सुरु आहे. यामुळे कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार हे येणाऱ्या काळात समोर येणार आहे.