बारामतीत अजित पवार यांचा पुन्हा इशारा! ढगरीवरील कार्यकर्त्यांना ओवाळून टाकण्याचा सूचक इशारा..!!


बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता दोन गट पडले आहे. अजित पवार गट आणि शरद पावर गट असे दोन गट पडले असून ते एकमेकांवर टीका करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता बारामती मध्येच शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

अजित पवार , बारामतीच्या राष्ट्रवादी च्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कानपिचक्या देताना इशारा दिला की, आपले काही लोकं वकील झाले आहेत, ते बाकीच्या ठिकाणीच फार लक्ष देतात. कुठे अध्यक्ष होतात, काय होतात. त्यांनी मनाला विचारावे की बारामती शहर, तालुक्याचा विकास कोणी केला. यातील अनेकांना मी मोठे केले, त्यांना पदे दिली, मानसन्मान दिला. हे लोक कोणाला माहित पण नव्हते. त्यातील अनेकांनी माझ्या तरुणपणात माझ्यासोबत काम केले आहे. पण आता ते गावोगावी घोंगडी बैठका घेत आहेत. मी कोणाला काय बोललो की बघा कसा बोलतो असे म्हणत आहेत, असे लोक ओवाळून टाकले पाहिजेत.

बारामतीच्या विकासाच्या मुद्दावर ते म्हणाले, एका जमिनीच्या विषयासंबंधी माझी आई कोर्टात गेली होती. तिने तेथील अस्वच्छता पाहिली. त्यानंतर मला सांगितले की, तू बारामतीचा आमदार आहे. स्वच्छतेबाबत तुझे कौतुक होते. पण जरा कोर्टात जाऊन अवस्था पहा, त्यावर मी त्रयस्थ व्यक्तीला तेथे जाऊन पाहणी करायला सांगितले. मी मागे कोर्टात गेलो होतो. पण तेथील न्याय व्यवस्थेला ते आवडले नव्हते. असे अजित पवार म्हणाले आहे.

त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने मी यावेळी त्यांच्या क्षेत्रातील एका मान्यवराला सांगून तेथील कामे पूर्णत्वाला नेतो असा शब्द दिला आहे. मी तेथे राज्य शासनाच्या माध्यमातून रंगरंगोटी, लॅण्डस्केपिंग करून देतो. बारामतीच्या नागरिकांना कोर्टात गेल्यावर जर स्वच्छ वाटत नसेल तर तो आमचा आणि बारामतीकरांचा कमीपणा आहे. शरद पवार गटाचे तालुका आणि शहराध्यक्ष वकील आहेत.

दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी मेडिकल कॉलेज संदर्भात देखील मोठी माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे त्याचबरोबर नागरिकांना आरोग्य सुविधा देखील चांगल्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय उभे केले जाणार आहे. त्या ठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवल्या जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!