पुण्यात अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, नेमकं काय घडलं?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार(Ajit Pawar)यांची साथ सोडत शिवसेना-भाजपशी घरोबा केला. त्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक बदल झाले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे आहे.
पुणे एअरपोर्ट येथे नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक; विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
परंतु भारतीय जनता पक्षालाही पुण्याचे (Pune) पालकमंत्री पद आपल्याकडेच हवे आहे. यावरुन विद्यामान पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरु झाला आहे. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठोस भूमिका घेतल्याची माहिती मिळाली आहे.
पुण्याचे कारभारी कोण, यावरील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील शीतयुद्ध पुणेकरांच्या मुळावर उठले असून, मे महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतील (डीपीडीसी) ४०० कोटी रुपयांच्या विकासकामांना तीन महिन्यांनंतरही मंजुरी मिळालेली नाही.
नाफेड फक्त नावाला.? कांद्याची अजूनही खरेदी नाही, शेतकरी चिंतेत
यामुळे पालकमंत्री पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याने या राजकारणात जिल्हा प्रशासनालाच मुख्यमंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे.
मी अजून दारूला स्पर्शही! अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले, पहिल्या धारेची किक अन्
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त १ जुलै रोजी तयार झाले आहे. त्यानंतर ते प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, २ जुलै रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर इतिवृत्त मंजुरीअभावी रखडले आहे. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील कोल्डवॉरचा हा परिणाम असल्याची चर्चा आहे.