Ajit Pawar : तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष…अजितदादांचा जुना व्हिडिओ व्हायरल, मनसेचा जोरदार हल्लाबोल

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेल. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिलं. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा झटका बसला.
या निर्णयाचे राज्यभरात पडसाद उमटत असून एकीकडे अजित पवार गटातील कार्यकर्ते आनंदात जल्लोष करत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटातील नेते, कार्यकर्ते संतापले असून पुन्हा लढाईसाठी सज्ज होण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. दोन्ही गटांमध्ये बॅनरबाजीही सुरू असून मुंबईत तसेच दिल्लीतही ठिकठिकाणी बॅनर युद्ध सुरू झाल्याचं पहायला मिळाले आहे. Ajit Pawar

अशातच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही अजित पवारांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांना डिवचलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे अधिकृत या एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे


'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का?
वाह रे पट्ठ्या…! 🤨 pic.twitter.com/ZXcOk6y6oy
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला, त्यावेळी अजित दादा महाविकास आघाडीसोबत होते. त्यामुळे आयोगाच्या या निकालावर बोलताना अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला होता. “तुमच्यात धमक असेल तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं?” असा अजित पवारांनी केलेला सवाल मनसेने व्हिडिओत हायलाईटही केला आहे.
‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का?, असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलं आहे. छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधण्यात आला आहे.