Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या यादीचा मुहूर्त लागला! ३२-३५ उमेदवारांना संधी, आज होणार उमेदवार जाहीर…

Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी आज संध्याकाळ पर्यंत जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या यादीत ३२- ३५ नाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करत असल्याची माहितीही पुढे आली आहे.
दरम्यान, दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उमेदवारांची यादी सुद्धा आजच येण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीमध्ये ५० उमेदवार असतील असे बोलले जात आहे. Ajit Pawar
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून बंडाळी केल्यानंतर त्यावेळी साथ दिलेल्या सर्वच आमदारांना पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं जाईल असे बोलले जात आहे. अजित पवार यांच्याकडूनही यादी लवकरात लवकर जाहीर केली जाईल असं बोलले जात आहे.