Ajit Pawar : शरद पवारांचे ‘हे’ नातेवाईक देणार अजित पवारांची साथ, बारामतीत चर्चांना उधाण…
Ajit Pawar : राज्यातील नाही तर देशाचे लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबातील दोघांमध्ये लढत आहे. नणंद-भावजयमध्येच लढत होत आहे.
राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन वेगळी वाट धरणारे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
विशेष म्हणजे सख्ख्या भावाने देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. खासदार शरद पवार यांचे सावत्र थोरले भाऊ पांडुरंग पवार यांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा दिला आहे.
पांडुरंग पवार यांनी घरावर बोर्ड लावत अजित पवार आणि सुनेत्रा पवार हेच आमचे कुटुंब आहे, असे म्हटले आहे. सख्ख्या भावाने साथ सोडली असताना शरद पवार यांच्या सावत्र भावाने अजित पवारांना साथ दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. Ajit Pawar
आम्ही अजित पवारांची साथ सोडणार नाही..
पांडुरंग पवार म्हणाले, माझे वय ७६ झाले असून मी लहाणपणापासून अजित पवार यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांचे आमच्यावर प्रेम आणि आमचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. या प्रेमामुळे आम्ही अजित पवारांची साथ सोडणार नाही. आगामी निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहोत.