Ajit pawar : राज्यात आता मुलाच्या नावापुढे आईचे नाव! मग वडीलांचे नाव मग आडनाव! अजित पवार यांची मोठी घोषणा..!!
Ajit Pawar : बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मध्ये एक मोठी घोषणा केली आहे. मुला मुलींच्या नावांमध्ये आधी आईचं नाव लावणार नंतर वडिलांचे नाव असेल अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
अजित पवार म्हणाले, आधी स्वतःचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव लावले जायचे मात्र इथून पुढे आधी मुलाचे किंवा मुलीचे नाव नंतर आईचे नाव आणि त्यानंतर वडिलांचे नाव आणि मग आडनाव असे संपूर्ण नाव असणार आहे.
अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. बारामती मधील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी ही घोषणा केली आहे. तसेच यावेळी त्यांनी बारामतीकरांबद्दल देखील आदर व्यक्त केला आहे. Ajit pawar
ते म्हणाले, बारामतीकरांनी मला आज आशीर्वाद दिला आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मी कामाला कुठेही कमी पडणार नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सत्तेत असू तर आपण कामे करू शकतो.
दरम्यान, तुमच्या आशीर्वादाने आज मी राज्यात सत्तेत आहे. जर आज मी सत्तेत नसतो तर कामे करायला जमलं असतं का? मला तुम्ही सांगा… असा देखील प्रश्न अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.