Ajit Pawar : मोठी बातमी! भाजपशी युती करण्याचा निर्णय शरद पवारांचा! अजित पवार यांच्या विधानाने मोठी खळबळ….
Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार आहे, याआधी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागावाटपासाठी बैठका सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची राज्यात ‘जन सन्मान’ यात्रा सुरू आहे. दरम्यान, काल बारामती येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी अप्रत्यक्ष खासदार शरद पवार यांना टोला लगावला आहे.
आपली राजकीय भूमिका कोणाला दुखवायची नव्हती, जो निर्णय घेतला तो पवार साहेबांना विचारुन आणि संमतीनेच, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेआहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी आधी मान्य केली होती आणि आताही मान्य करतो, असही अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवार म्हणाले, मला राजकीय भूमिका घ्यावी लागली ती साहेबांना विचारून घेतली. ते सुरुवातीला हो म्हणाले परत म्हणाले की ही, भूमिका मला घेता येणार नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पुढे गेलो. पण हे सगळे होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. मात्र आता काय झाले दोन पक्ष झाले आहेत.
सध्या दोन्ही बाजूंची पवार मंडळी सगळ्यांना येऊन भेटायला लागली, सगळ्यांची विचारपूस करायले लागले. कधी न दिसणारे परंतु आता साड्या द्यायला लागले, स्टीलची घमेले द्यायला लागले, स्टीलचे डबे द्यायला लागले. सध्या नवरात्र आहे. स्त्रीशक्तीचा आदर केला पाहिजे, असे अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता. Ajit Pawar
आगामी निवडणुकीच्या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले. मी मधल्या काळात पक्क ठरवलं होतं की बास झाले आता. पण कधी ना कधी थांबावं लागते, पण लोकांच्या रेट्यापुढं काही गोष्टी कराव्या लागत असतात. गेल्या वेळची परिस्थिती वेगळी होती.
साहेबांच्या वयाचा विचार करत लोकसभेला सुप्रिया सुळे मतदान करायचे मानसिकता बारामतीकरांची होती. शेवटी मतदाराला अधिकार आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी मोठी चूक मी मान्य केली. आता मागचे सर्व विसरुन पुढे जायचे, असेही अजित पवार म्हणाले.