अजित पवार यांनी ‘मला मूर्ख समजू नका’ ‘मला चूत्यात काढू नका’ म्हणत बारामतीत दर्जेदार वृक्षारोपण झालं पाहिजे म्हणत कार्यकर्त्यांना सुणावलं ..


 

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळपासूनच बारामतीचा दौरा करीत आहे. तालुक्यात अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 65 हजार वृक्ष वाटप हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हाती घेण्यात आला आहे . ‘एक कुटुंब एक झाड’ या उपक्रमांतर्गत अजित पवार या उपक्रमातून तालुक्यात वृक्षारोपण होत आहे. यावेळी बोलताना अजित पवारांनी एक किस्सा मांडला व तो फार चर्चेत आला आहे.

अजित पवार म्हणाले , बारामती गेल्या काही वर्षात किती बदलली. याचे दाखले देताना त्यांनी ज्यांच्या दारासमोर झाडे लावण्यासाठी जागा आहे, अशांनी झाडे लावावीत असे आवाहन त्यांनी केले. तर दादांनी चांगल्या प्रकारे पाच वृक्षांची लागवड करणाऱ्या कार्यकर्त्यांना अथवा नागरिकांना 5000, 3000 व 1000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

चांगल्या प्रकारे हे काम करा म्हणून , या कामाचे परीक्षण आमची पर्यावरण प्रेमी जे लोक करणार आहे आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. मात्र यामध्ये कोणीही दिखाऊपणा करू नका. आपल्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी झाडे लावणे व ती वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र याचा चुकीचा दाखला देत, जुनी झाडे वेगळ्या पद्धतीने समितीला दाखवू नका असे अजित पवार यांनी सांगून कार्यकर्ते काय डोकं लावतील हे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.

तेवढ्यात अजित पवार सहज म्हणाले. त्यांच्या तोंडी एक शब्द आला, पण तेवढ्यात तो शब्द आवरून ते म्हणाले, चुत्या हा शब्द मी म्हणणार नाही. पण मला मूर्ख समजू नका असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हा शब्द वापरला होता. त्याची कोटी करताना अजित पवारांनी तो शब्द उच्चारता उच्चारता आवरला, शिवाय त्यावर स्पष्टीकरणही दिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!