Ajit Pawar : आमचे नेते नरेंद्र मोदीच आहेत, ७ तारखेनंतर तुम्हाला भेटायला अजित पवारच येणार, बारामतीत अजितदादांची मतदारांना भावनिक साद…


Ajit Pawar : शरद पवारांची साथ सोडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मोदींशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. आमचे नेते नरेंद्र मोदी आहेत, आम्ही सांगतोय की, मोदीच पंतप्रधान होणार. आमच्या विरोधकांनी कोण पंतप्रधान होणार हे सांगावे, असे आव्हान त्यांनी केले.

अजित पवार म्हणाले, मला सांगा, बारामतीचा आमदार विकासाच्या बाबतीत कमी पडला आहे का? विकासाचा निधी देण्याची धमक फक्त अजित पवारांमध्ये आहे, त्यामुळे भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही, स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती उमेदवार म्हणून दिला आहे, मी सांगतो तसे तुम्ही केलं, तर बारामतीचा विकास झपाट्याने करून दाखवतो.

यामुळे आपल्या पाठीमागे उभे राहा. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत सांगितले. बारामतीतील तांबे नगर येथे आजी माजी सैनिकांच्या कुटुंबांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अजित पवार बोलत होते यावेळी अजित पवार म्हणाले, अनेक जण भेटायला येतील. Ajit Pawar

जे कधी भेटले नव्हते ते देखील भेटायला येतील. हे सगळे फक्त ७ तारखेपर्यंत येतील. परत तुम्हाला भेटायला अजित पवारच आहे. मीच तुमची कामे करणार, हे बाकीचे फक्त राजकारण करीत आहेत. यामुळे तुम्ही याबाबत सावध राहा.

केंद्राचा निधी मोठा मिळत असतो, परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षात केंद्राचा निधीच आला नाही. 100 टक्के नोकऱ्या देणे शक्य नाही. प्रत्येकाचा काळ असतो. ही भावकीची निवडणूक नाही. भावनिक होऊन या निवडणुकीकडे बघू नका.१४० कोटी जनतेचा नेता खमक्या असला पाहिजे.

आताच्या खासदारांना तीन वेळा निवडून दिले. पण तुम्ही मी जो म्हणतो त्या खासदाराला निवडून द्या. लक्षात घ्या, देशाचे भवितव्य कुणाच्या हातात चांगले राहू शकते? ज्या लोकांना वेळ असताना देखील ते मंत्री झाले नाहीत. मंत्री असताना आपण काम करू शकलो असतो, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!