Ajit Pawar ncp : मोठी बातमी! बारामतीमधून लोकसभेचा उमेदवार कोण असणार? अजित पवारांनी थेट नाव न घेता उमेदवारीच जाहीर केली…

Ajit Pawar ncp : बारामतीत अजित पवार गटाचा बुथ कमिटी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे संकेत दिले. बारामतीत उमेदवार कोण असणार? हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपला उमेदवार नवीन असणार आहे. पहिल्यांदा खासदार होणार असणार आहे. असं बोलत अजित पवार यांनी प्रथमच खासदारकीला उभा राहणारा उमेदवार नवीन असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बारामतीमधून सुनेत्रा पवार उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. तसेच शरद पवार यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला ही जागा मिळणार आहे.

अजित पवार गटाकडून उमेदवार कोण? याची पुष्टी झालेली दिसते. बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. Ajit Pawar ncp
दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा लोकसभेसाठी खासदारकी लढवणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. केवळ यासंदर्भात अधिकृत घोषणा बाकी आहे. आता बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या माहिती व कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ फिरू लागला आहे. त्यासाठी गाडीवर फ्लॅक्स लावले आहे.