लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी केली मोठी घोषणा, म्हणाले, योजना बंद करणार…


मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. या चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझील लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं म्हंटले आहे.

मुख्यमंत्री माझील लाडकी बहीण योजना ही योजना बंद होणार असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात होते. यावरच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, ही योजना बंद केली जाणार नाही, पण त्यामध्ये काही सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना अधिक लाभ मिळेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही सकारात्मक परिणाम दिसून येईल.

अजित पवार यांनी या उत्तरामध्ये बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठ्या घोषणा केल्या. लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत.लाडकी बहीण योजनेत दुरूस्ती करणार आहोत,पण योजना बंद करणार नाहीत, असं म्हणत अजित पवार यांनी योजनेत नवे निकष आणण्याचे संकेत दिले. लाडकी बहीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणार असल्याचं ते म्हणाले.

अजित पवार यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहणार नाही, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यात आणखी सुधारणा करण्यात येतील. सध्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५००० थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात. आता, या योजनेसह महिलांसाठी विशेष कर्ज योजना आणण्याची योजना आहे.

दरम्यान, मुंबई बँकेत लाडकी बहीण योजनेच्या खातेदार महिलांना १०,००० ते २५,००० पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. तसेच, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा सहकारी बँका आणि इतर सहकारी बँकांनाही अशा स्वरूपाच्या कर्ज योजना सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे ज्या महिलांना छोटा-मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना मोठी संधी उपलब्ध होईल.

लाडकी बहीण योजनेद्वारे दरवर्षी सुमारे ४५,००० कोटी महिलांच्या हाती जात आहेत. त्यामुळे हा पैसा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देईल. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ही योजना आणखी प्रभावी केली जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!