Ajit Pawar : शरद मोहोळ हत्या प्रकरणी अजित पवारांनी केले मोठे वक्तव्य, म्हणाले, वस्तुस्थिती लोकांपुढे..

Ajit Pawar पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी भररस्त्यातच झालेल्या हत्येने खळबळ उडाली होती. शरद मोहोळच्या हत्येने अख्खं पुणं हादरलं होतं. शरद मोहोळची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पुणे शहरात काल एक घटना घडली होती. पोलिसांनी तातडीने दोषींपैकी अनेकांना पकडले आहे. Ajit Pawar
या प्रकरणाचा तपास झाल्याशिवाय, संपूर्ण कागदपत्र पुढे आल्याशिवाय मी या प्रकरणाबद्दल बोलणे उचित नाही, पण मी इतकेच तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या संदर्भात जी काही वस्तूस्थिती आहे ती लोकांसमोर आणली जाईल, असे अजित पवार म्हणाले आहेत.
पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने माझं शहरावर सतत लक्ष असते . मी राज्यासाठी तर काम करतच असतो, ती आमची जबाबदारी असते. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर विकासाबाबतीत मागे राहू नये, म्हणून प्रयत्न सुरु असतात. निगडीपर्यंत मेट्रोचं स्टेशन मंजूर झाले आहे. तसेच शिवाजीनगरला सेशन कोर्टजवळ मेट्रोचं जंक्शन असेल, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.