एकनाथ शिंदे, अजित पवार बारामतीत ! कार्यकर्त्यांची भेटीसाठी मोठी गर्दी… !!
बारामती : महासन्मान मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत आहेत. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नऊ मंत्री देखील येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने आज बारामती पक्षाचा महा जनसन्मान मेळावा होणार आहे. यासाठी आज अजित पवार सकाळीच बारामतीत आहेत. अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासकीय विमानाने बारामतीत येत आहेत. ते बारामतीतून शासकीय वाहनातून पंढरपूरला जाणार आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या सोहळ्याची पूर्वतयारी पाहून ते परत बारामती मध्ये पोहोचणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंद हे मुंबईकडे प्रयाण करतील.
Views:
[jp_post_view]