Ajit Pawar : अखेर अजित पवार यांची बारामतीमधून उमेदवारी जाहीर, प्रफुल पटेल यांनी केली घोषणा…

Ajit Pawar : लोकसभेला बारामती मतदारसंघात जे घडले त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या चर्चा सुरू आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच लढणार असल्याचे बोलले जात होते.
अजित पवार हेच बारामती विधानसभेतून निवडणूक लढतील, अशी घोषणा प्रफुल पटेल यांनी केली आहे. पटेल यांच्या घोषणेनंतर अजित पवार यांच्या मतदारसंघ बदलण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद भावजय यांच्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभेतून सुनेत्रा पवार यांना सुमारे 47 हजारांची पिछाडी मिळाली. बारामतीमध्ये हजारो कोटींचे विकासकामे करूनही बारामतीकरांनी साथ दिली नाही, अशी खंत गेली तीन महिने अजित पवार सतत बोलून दाखवत होते. Ajit Pawar


तसेच बारामतीशिवाय माझ्याशिवाय दुसरा कुणी आमदार आल्यावर तुम्हाला कळेल. जिथे पिकते तिथे विकत नाही, अशी नाराजीही त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवली. तसेच पुत्र जय पवार बारामतीमधून लढतील, असे संकेतही त्यांनी गेली दोन महिने दिले.
मात्र पक्षातील पदाधिकारी आणि बारामतीमधील स्थानिक नेते अजित पवार यांच्या उमेदवारीसाठीच आग्रही होते. अजित पवार यांनीही अगदी शेवटापर्यंत उमेदवारीसंदर्भात संभ्रम ठेवला आहे.