Ajit Pawar : मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले मनोज जरांगे यांच्या भूमिकेनंतर…
Ajit Pawar : मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी आमरण उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी ३० दिवसांची मुदत मागितली होती. राजगुरूनगर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या नेतृत्वात सभा झाली. Ajit Pawar
यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांना राज्यात कुठेही सभा घेण्याचा अधिकार आहे. त्यातून ते त्यांची भूमिका मांडत आहेत. Ajit Pawar
राज्य सरकारला दिलेल्या चाळीस दिवसांची मुदत पुढील दहा दिवसांनी संपणार आहे. त्यानंतर त्यांची ते भूमिका पुन्हा मांडणार आहेत. त्यावेळी राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी भूमिका अजित पवार यांनी Ajit Pawar मांडली.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत सर्वांची मते जाणून घेण्यात आली. त्यात सध्याच्या आरक्षणाला धक्का न लागता इतर समाजाला आरक्षण द्यावे, असे त्या बैठकीत ठरले होते. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात यापूर्वी दिलेले आरक्षण नाकारण्यात आले आहे.
त्यातील त्रुटी दुरुस्ती करून कायद्याच्या चौकटीत ते कसे बसेल या संदर्भात काम सुरू आहे, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी शिंदे समिती नेमलेली आहे त्यांचाही या संदर्भात अभ्यास सुरू आहे.
मात्र, मागास आयोगाने मराठा समाजाबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अभ्यास करावा असे काहींचे मत आहे त्या संदर्भातील काम सुरू आहे. वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.