Ajit Pawar : अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर, अखेरच्या क्षणी कोणाला कुठून मिळाली संधी?

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आह. आपल्या चौथ्या यादीत अजित पवार गटाने दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. अजित पवारांनी ठाकरे गटाच्या नेत्याला संधी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत २ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भोर आणि मोर्शी मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले. Ajit Pawar
अजित पवार गटाची चौथी यादी…
मोर्शी मतदारसंघ – देवेंद्र महादेवराव भुयार
भोर मतदारसंघ – शंकर हिरामण मांडेकर
या चौथ्या यादीत मोर्शी मतदारसंघातून देवेंद्र महादेवराव भुयार यांना संधी देण्यात आली आहे. तर, भोर या विधानसभा मतदारसंघात शंकर हिरामण मांडेकर यांना तिकीट देण्यात आलंय. अजित पवार गटाने आतापर्यंत ५१ उमेदवार जाहीर केले आहेत. तर, भाजपने आतापर्यंत १४६ उमेदवार जाहीर केले असून शिंदेंनी सहयोगी मित्र पक्षांसह ८० जागा जाहीर केल्या आहेत.
म्हणजेच महायुतीत आतापर्यंत २७७ जागा जाहीर झाल्या आहेत. उर्वरित १० जागा अद्यापही जाहीर होणे बाकी आहे. त्या कोणाच्या वाट्याला जातात हे पाहावं लागणार आहे. या उर्वरित जागा जाहीर झाल्यानंतरच महायुतीतील फॉर्म्युला स्पष्ट होईल.