Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवारांकडून निवडणुकांच्या तारखांच्या आधीच पहिला उमेदवार जाहीर…
Ajit Pawar : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत.
महायुतीने जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात केली असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा निवडून द्या, अशी अप्रत्यक्ष घोषणा केली आहे.
चाकण नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला, ज्यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी दिलीप मोहिते पाटील यांचे विधानसभेतील कार्याचे कौतुक केले आणि त्यांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले. Ajit Pawar
पवार म्हणाले की, महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत अद्याप काही ठरलेले नाही, पण राष्ट्रवादीला जर खेड आळंदीच्या जागेवर उमेदवारी मिळाली तर कार्यसम्राट दिलीप मोहिते पाटील यांना संधी द्या.
दरम्यान, पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या “सरपंचापासून आमदारापर्यंत” च्या प्रवासाचे कौतुक करत, त्यांना मंत्रीपदाची संधी देण्याचे आश्वासन दिले. आता त्यांना पुढच्या टप्प्यात एक संधी देण्याची वेळ आली आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.