ब्रेकिंग! शरद पवार गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव, अजित पवारांकडे ‘तो’ पुरावाच नाही, शरद पवार गटाचा दावा…
नवी दिल्ली : राज्यात आता शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वात मोठी फूट पाडली. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षामध्ये दोन गट पडले आहेत.
शरद पवार यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू नेत्यांनी अजित पवार गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. अशातच आता शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल केली आहे. अजित पवार यांनी दाखल केलेली याचिका अकाली आणि दुर्भाग्यपुर्ण आहे.
त्यांच्या याचिकेत पक्षाच्या दोन्ही गटाचा कोणताही उल्लेख नाही, किंवा तसा पुरावादेखील त्यांच्याकडे नाही.
त्यामुळे अजित पवार गटाने केलेली मागणी फेटाळण्यात यावी, असे शरद पवार गटाने याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त खासदारांचा आणि आमदारांचा पाठिंबा दिला असल्याने त्यांना पक्षाचे चिन्ह आणि नाव दिले होते. अजित पवार गटाकडेही जास्त आमदारांचा पाठिंबा आहे.
आता निवडणूक आयोग शिंदे गटाप्रमाणे अजित पवार गटाला पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळणार का याकडे संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष लागले आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अजित पवारांसह शपथ घेतलेल्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.