Ajit Pawar : कार्यकर्त्याच्या मृत्यूप्रकरणी अजितदादांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, राजकारणात खळबळ..
Ajit Pawar : काल मनसे कार्यकर्त्यांनी अकोला येथे अमोल मिटकरींची गाडी फोडली. या राड्यावेळी उपस्थित असलेल्या एका मनसे कार्यकर्त्याचा नंतर ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आता यावरुन राजकारण सुरु झाले आहे.
ज्या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला, त्या बद्दल महाराष्ट्र सरकारने ताबडतोब आमदार अमोल मिटकरी, उमेश पाटील व अजित पवार यांच्यावर ३०७ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे.
अमोल मिटकरी एका संविधानिक पदावर आहेत. राज साहेबांनी कोणाची सुपारी घेतली? जरंडेश्वर कारखान्याची तर सरकारने चौकशी केली. खुद्द पंतप्रधानाने इंदूरच्या सभेत सांगितले होते ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला, पवार कुटुंब एकत्र असताना कन्नडचा कारखाना कसा घेण्यात आला? असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला. Ajit Pawar
अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल सुपारीबाज हा शब्द वापरला, त्यानंतर मनसे कार्यकर्तेच संतप्त झाले. कार्यकर्ते जाब विचारायला गेल्यानंतर त्याचा परिणाम गाडी फोडण्यात झाली, मिटकर यांनी आक्रस्ताळपणे पोलीस स्टेशनमध्ये धरणे देऊन गुन्हे दाखल करा अशी मागणी केली. त्याचा तणाव येऊन आमच्या तरुण कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, असे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.