Ajit Pawar : शरद पवारांचे निवृत्तीचे संकेत अन् अजितदादांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, मी यासाठी खूप मोठी किंमत…
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात अनेक नेतेमंडळींकडून पक्षप्रवेश केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत प्रचार सभेत बोलताना राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी म्हंटले की, निवृत्तीचे संकेत दिलेत, मी याची मोठी किंमत चुकवली आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं मला व्हिलन ठरवले होते. अशा प्रकारचा प्रसंग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेला होता. Ajit Pawar
ते सगळं जाहीर केल्यानंतर दोन ते तीन दिवसातच त्यांनी तो निर्णय फिरवला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर असं ते म्हणाले होते. उद्याला शरद पवार यांच्या मनात नक्की काय आहे हे महाराष्ट्रातल्या कोणालाही आजपर्यंत कळलं नाही. अगदी मी घरातला असलो तरीही घरातल्या व्यक्तीलासुद्धा कळलेलं नाही असे उत्तर अजित पवार यांनी दिले आहे.
दरम्यान, मी १४ निवडणुका लढलो आणि त्यात विजयी झालो. अजून दीड वर्षे मी राज्यसभेचा खासदार असणार आहे. मुदत संपली की पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही याचा विचार करावा लागेल. मी लोकसभा लढणार नाही. आता किती निवडणुका लढवायच्या. त्यामुळे आता थांबले पाहिजे असे शरद पवार मंगळवारी बारामतीत बोलताना म्हणाले आहे.