Ajit Pawar : बारामती लय पुढची आहे, त्यांना लय शिकवायला जाऊ नका, मलाच उडवून लावलं, तुम्हाला तर….

Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.
तसेच काही ठिकाणी पक्षातील वरिष्ठ नेते हे महाराष्ट्राचे दौरे करताना, यात्रा करताना पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा करण्यात व्यस्त आहे.
तसेच बारामतीत कार्यकर्त्यांचे वाद मिटवण्यासाठी अजित पवारांनी पक्ष नरीक्षक पाठवला मात्र या पक्षनिरीक्षकाला फारसा भाव मिळालाच नाही आज तर अजित पवारांनी थेट स्वतःवरूनच एक उदाहरण दिले आणि पक्ष निरीक्षकांना मोलाचा मंत्र दिला आहे.
बारामतीच्या भाषणात अजित पवार म्हणाले, बारामतीकरांना फार शिकवायला जाऊ नका.? इथं सगळं लय पुढचं आहे.. माझंच ऐकत नाहीत , मलाच उडवून लावतात, तर तुम्हाला तर कधीच कोलून टाकतील. Ajit Pawar
त्यामुळे त्यांच्याच कलाने घ्यायचे. ‘असे तर असे’ तसे तर तसे ’ असे करतच पुढे जायचे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने सांगायला जाल तर म्हणतील, हा कोण टिकोजीराव आलाय आम्हाला सांगायला? त्यामुळे जमिनीवर पाय ठेवून काका, मामा म्हणून काम करा.
पुढे ते म्हणाले, अजित पवार म्हणाले, एवढा पाऊस झाला बारामती कुठे तुंबली का? कुठेतरी पाणी शिरले का? नाही ना? अहो, आपण काम केले म्हणून हे घडले आहे.
मला सुनील तटकरे म्हणाले दादा हे असं कसं? मी म्हटलं केले असंच. पण मग ते म्हणाले, एवढं करूनही मग इथं असं कसं होतंय? मी म्हटलं, ते विचारायचं नाही. फक्त काम करायचं आपल्या हातात आहे, दाबायचे यांच्या हातात.. असे ते म्हणाले आहे.