Ajit Pawar : म्हाताऱ्याला वय विचारलं, मुलांचं वय विचारलं, नंतर अजितदादा म्हणाले, बारामतीचं सगळं…! तालुक्यात चर्चांना उधाण..

Ajit Pawar : निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांच्या प्रचार सभा होऊ लागल्या आहेत. या प्रचार सभांमधून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच बुधवारी सकाळीच त्यांनी बारामतीतील ग्रामीण भागाचा दौरा करून मतदारांशी संवाद सांधला आहे.
यावेळी ते म्हणाले, बाकीच्यांचे वय बघता पुढे बारामतीचे मलाच सगळे बघायचे आहे, असे वक्तव्य करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वयाकडे पुन्हा बोट दाखवले. लोकसभेवेळी साहेबांना खूश केले, आता विधानसभेला मला खूश करा, असे आवाहन करताना मतदानाचा टक्के वाढला पाहिजे, असा आग्रह देखील त्यांनी धरला.
महायुतीचे प्रमुख नेते म्हणून राज्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार करतानाच बारामतीकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी अजित पवार घेताना दिसून येत आहे. जसा वेळ मिळेस तसा बारामतीतील गावखेड्यांत जाऊन ते मतदारांना साद घालत आहेत.
गेल्या ३० वर्षात बारामतीचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न केला. आताही रखडलेली आणि आखलेली कामे पूर्ण करण्यासाठी मतरुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन अजित पवार मतदारांना करीत आहेत. बुधवारी सकाळीच त्यांनी बारामतीतील ग्रामीण भागाचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला. Ajit Pawar
अजित पवार यांनी लोणी भापकर गावात जाऊन ग्रामस्थांची स्नेहपूर्ण भेट घेतली. समोर बसलेल्या बाबासाहेब नामे ज्येष्ठ नागरिकाला त्यांनी वय विचारले. त्यांनी वय वर्षे ८३ सांगितल्यावर तुमची मुलेच सगळे काही बघत असतील, असे म्हणत ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले पाहिजेत ही जगाची रीत असल्याचे आहे, असे आर्जव करून पुन्हा शरद पवार यांनी मार्गदर्शन करावे, असे अप्रत्यक्षपणे अजित पवार म्हणाले.