Ajit Pawar : एकाच ठोक्यात दोन तुकडे करण्याची माझ्यात धमक – अजित पवार

Ajit Pawar यवत : एकाच ठोक्यात दोन तुकडे करण्याची माझ्यात धमक आहे. मोदींन सारखा विकास कोन करेल काय, असे सांगत मोदींच्या विचाराचा खासदार पाठवा कसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथे केले आहे.

दौंड तालुक्यातील चौफुला येथे भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारानिमित्त कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करीत होते.
ते म्हणाले, राज्यातील मतदारांची भावना होती अजित पवार यांनी पवार साहेबांना या वयात असं सोडायला नव्हतं पाहिजे.पण भारत देशानेच ज्या नरेंद्रजी मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे.त्याच नरेंद्रजी मोदींना आपण साथ देऊन विकास कामांना गती मिळवण्याचे काम करू.मोदीं सारखं नेतृत्व दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे नाही.

तिसऱ्यांदा भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून ढिगाने मतदान करा.दौड तालुक्यातील रस्ते, पाणी,वीज, कारखाना या सगळ्या विकास कामांसाठी भरभरून निधी देण्यात येईल.

एका बाजूला नरेंद्र मोदी तर एका बाजूला राहुल गांधी तर सांगा कोण देशाचा जास्त विकास करेल, नरेंद्र मोदीच करणार! त्यामुळेच घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करा.निवडणुकी नंतर काही लोक ईथ गरम होत आहे असे सांगून विदेशात फिरायला जातील पण मी ईथे तुमच्या कामासाठी हजर असणार आहे. Ajit Pawar
याप्रसंगी आमदार अँड राहुल कुल, कांचन कुल, भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, प्रेमसुख कटारिया, मंगलदास बांदल, राहुल शेवाळे, मोहन म्हेत्रे, नामदेव बारवकर आदी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल कुलांचा मंत्रीपदाचा निर्णय फडणवीस घेतील -अजित पवार
राहुल कुल जर घड्याळाकडे आले तर त्यांना कॅबीनेट करु,आता ते भाजपा मध्ये आहेत तर कॅबिनेट बनवण्याचा निर्णय देवेंद्रजीं कडे आहे माझ्याकडे नाही-अजित पवार.