‘त्या’ वक्तव्यावरून अजितदादांनी आपल्याच तीन आमदारांना झापल, मुख्यमंत्र्यांची आमदाराने मागितली माफी..

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर चांगलेच संतापाल्याची माहिती असून, भडकलेल्या अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच या आमदाराची खरडपट्टी काढल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री बदलावरून वक्तव्य करणाऱ्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच झापलं आहे. अजित पवारांच्या आदेशानंतर अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागितल्याची माहितीही समोर आली आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम आणि अमोल मिटकरी यांनाही मुख्यमंत्री बदलाबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुनावलं आहे. गेले दोन दिवस अजित पवार मुख्यमंत्री होणार यावरून चर्चा सुरू होती.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे भर पडली होती. सरकारमध्ये सहभागी असताना अशाप्रकारची संभ्रम व्यक्त करणारी वक्तव्य आल्यामुळे अजित पवार नाराज झाले होते.
दरम्यान, अजित पवार लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार आणि मंत्री अनिल पाटील यांनीही मिटकरी यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. लवकरच अजित पवार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे अनिल पाटील म्हणाले होते.