लीलावती रुग्णालयात अघोरी प्रकार! आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य अन्…,

मुंबई : लीलावती रुग्णालयातील १२५० कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरण समोर आले असताना लीलावती रुग्णालयाबाबत नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. इथं विजय मेहता आणि ट्रस्टींनी अध्यक्षांच्या केबिनमध्ये काळी जादू केल्याचं समोर आले आहे.
लीलावती रुग्णालयाचे विश्वस्त विजय मेहता आणि अन्य काही जणांनी मिळून एका केबिनमध्ये फरशीच्या खाली तंत्र-मंत्राचे साहित्य पुरुन ठेवल्याचा आरोप लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी केला. त्यांनी नुकतीच यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली होती.
लीलावती ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काळी जादू आणि अघोरी कर्मकांड केल्याचे त्यांनी म्हटले. रुग्णालयातील केबिनच्या फरशीखाली ८ कलश मिळाले आहेत. या आठ मडक्यांमध्ये तांदूळ, मानवी हाडे आणि केस आढळून आली आहेत.
दरम्यान, ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काळी जादू, अघोरी कर्मकांड केल्याची माहिती दिली होती. त्याआधारे संबंधित कार्यालयात खोदकाम केले असता तेथे मानवी अवशेष असलेली आठ मडकी, तांदूळ, केस आढळून आले. देशातील एका नामांकीत रुग्णालयात अशाप्रकारे जादूटोण्याचा प्रकार घडल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.