विद्या प्रतिष्ठानची पुन्हा कौतुकास्पद कामगिरी! 94 विद्यार्थ्यांचा पोलीस दलात झेंडा…
बारामती : बारामती म्हंटल की अनेक वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. यामुळे बारामती नेहेमी चर्चेत असते. असे असताना येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा समिती अंतर्गत पोलीस शिपाई या पदासाठी ३४ विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस दलात भरती होऊन राज्यसेवा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील असंख्य विद्यार्थी तहसीलदार, लेखाधिकारी, विक्रीकर निरिक्षक, लेखापरीक्षक, पोलीस काॅनस्टेबल, पोलीस उपनिरीक्षक इ. पदावर विराजमान झालेले आहेत. मागील महिन्यात ६० विद्यार्थी पोलीस भरती झाले होते. त्यांचा अजित पवार यांनी सत्कार केला होता, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी दिली.
सध्या या महाविद्यालयाची ओळख ग्रामीण भागातील राज्यसेवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उत्तम अभ्यासाचे केंद्र म्हणून झाली आहे. मागील ५ वर्षात विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातून एकूण १६६ विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झाले आहेत.
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा आग्रह केल्यामुळे अनेकांना याचा फायदा होत आहे. यामुळे अनेकजण सेवेत रुजू झाले आहेत.