रेव्ह पार्टी प्रकरणानंतर आता अजून एका पार्टींचाही होणार तपास!! 8 जण, 5 रुम अन्…

पुणे : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथून रविवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता या प्रकरणात आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे… तो म्हणजे या आधी एप्रिल आणि मे महिन्यातही याच हॉटेलात हाऊस पार्टी झाल्याचा तपशील.

खराडीतील स्टे बर्ड हॉटेल हेच ठिकाण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पोलिस सूत्रांनुसार, एप्रिल 2025 मध्ये ६ जणांसाठी ३ रुम बुकिंग करण्यात आलं होतं. मे २०२५ मध्ये २ जणांसाठी २ रुम बुकिंग झालं होतं

दरम्यान, या दोन्ही महिन्यातही “हाऊस पार्टी” झाल्याचा संशय व्यक्त होत असून, आता त्या पार्टींमध्ये कोण सहभागी होते, कुठून आले होते आणि ड्रग्जचा वापर झाला होता का? याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रांजल खेवलकर अटकेनंतर एकनाथ खडसे यांनी थेट पुणे पोलिसांवरच संशय व्यक्त केला आहे. त्यांचा दावा आहे की, “माझ्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठीच पाळत ठेवली जात होती. प्रांजल कधीही ड्रग्जच्या संपर्कातही नव्हता. त्याला फसवण्यात आलं.” खडसे यांनी कोणत्याही मंत्र्यावर आरोप न करता पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
