ढाब्यावर जेवण करून निघाले, घरी परतत असताना भयंकर घडलं, भीषण अपघातात कारचा चक्काचूर, तिघा मित्रांचा मृत्यू


छत्रपती संभाजीनगर : पाच मित्र धाब्यावरुन जेवण करून छत्रपती संभाजीनगरकडे परतत असताना भरधाव कार रस्त्यावरील पुलाच्या दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कोणाच्या मनात सुद्धा नसताना हा अपघात घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी आहेत. अपघातात चारचाकी वाहनाचा चुराडा झाला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर- जळगाव राष्ट्रीय महामार्ग बिल्डा फाट्याजवळ रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी याठिकाणी धाव घेतली.

तसेच जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाच जण फुलंब्री रस्त्यावरील ढाब्यावर कारने जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगरकडे छत्रपती संभाजीनगर – जळगाव राष्ट्रीय महामार्गावरुन ते निघाले. वेगात असलेली चारचाकी बिल्डा फाट्याजवळ आली. यावेळी रस्त्यावरील पुलाचा अंदाज न आल्याने कार पुलाच्या दुभाजकाला धडकली.

वेग असल्याने कार रस्त्यात उलटली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे घटी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. मृताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या अपघातात अरफात बागवान, रेहान सय्यद, सय्यद मारूफ यांचा जागीच मृत्यू झाला.

तसेच सय्यद उजेफ, शेख शारीक हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांना मिळाली. पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. अपघातात सय्यद मारुन माजीद, रियान जमील शेख, अरफात आसिफ शेख, अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!